धरणगावात अहिर शिंपी समाजाचा हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात

धरणगाव (प्रतिनिधी) येथे क्षत्रिय अहिर शिंपी समाज शाखा महिला अध्यक्ष शैलाताई प्रमोद जगताप व मंडळाच्या वतीने तसेच अ.भा .महिला आघाडी अध्यक्ष  हर्षदाताई बोरसे व जळगाव जिल्हा अध्यक्ष अंजलीताई बाविस्कर यांच्या सहकार्याने नुकताच हळदी-कुंकवाचा कार्यक्रम खूप उत्साहात संपन्न झाला. यावेळी नामदेव महाराजांच्या प्रतिमेला हार पुष्प घालून दीप प्रज्वलन करण्यात आले.

 

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिला आघाडी अध्यक्ष हर्षदाताई व धरणगाव येथील नगरसेविका अंजलीताई विसावे, माजी नगरध्यक्षा उषाताई वाघ तसेच जळगाव जिल्हा सचिव आरती शिंपी, सहसचिव सारिकाताई शिंपी, जिल्हा सदस्य माधुरीताई शिंपी, समाजसेविका अनिताताई खैरनार, जयश्री शिंपी, कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच तालुकाध्यक्ष शैलाताई जगताप व धरणगाव तालुक्यातील सर्व कार्यकारणी तसेच सर्व समाज भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होत्या. मान्यवरांचा सत्कार येथील महिला पदाधिकारी व सदस्यांनी केला. सौ. हर्षदाताई यांनी तेथील महिलांना मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, महिलांनी जास्त संख्येने समाजकार्य पुढे यावे, युवक-युवतींना पुढे आणावे, तसेच राष्ट्राध्यक्ष सुनील बापू निकुंभ यांच्या संकल्पनेतून आलेलाएक मूठ धान्य हा उपक्रम समाजाच्या वतीने राबवला जावा. शैला ताई जगताप यांनी प्रास्ताविक केले, सचिव सौ. ज्योतीताई मांडगे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

यावेळी धरणगाव कार्याध्यक्ष सविताताई जगताप यांची नुकतीच मध्यवर्ती संस्थेत मका सदस्य म्हणून नियुक्ती झाली त्यांचा पण सत्कार हर्षदा त्यांच्या हातून करण्यात आला. नंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला, त्यात खास आकर्षण म्हणून सौ. अंजलीताई यांच्या सौजन्याने स्वराज्य ग्रुप जळगाव प्रस्तुत भारुड हा समाज प्रबोधन पर कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यातून दारूबंदी, बेटी बचाव बेटी पढाव, मोबाईल अतिवापर विषयांवर प्रबोधन करण्यात आले. प्रणिता शिंदे हिने गोंधळ नृत्य सादर केले. आलेल्या महिलांना हळदी कुंकू वाण घेऊन तेथील जेष्ठ महिलांचाही सत्कार करण्यात आला व नुकत्याच स्वर्गवासी झालेल्या महिला भगिनींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच समाजभूषण पुरस्काराने सन्मानित हर्षदाताई बोरसे यांचे अभिनंदन करण्यात आले. धरणगाव महिला मंडळ उपाध्यक्ष सौ.कुमुदिनीताई नेरपगार, सहसचिव संगीताताई बोरसे, कोषाध्यक्ष वंदनाताई मांडगे महिला संघटक शैलाताई सोनवणे, कार्यालय प्रमुख मनीषाताई जगताप, भावना ताई नेरपगार, सविताताई जगताप यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Add Comment

Protected Content