रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर रावेर ते सावदा दरम्यान खड्डे पडल्याने अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. या महामार्गामुळे वाहनधारकांना दिवसेंदिवस होणारा त्रास लक्षात घेऊन उद्योजक श्रीराम पाटील यांनी पुढे सरसावत महामार्गावरील खड्डे स्वखर्चाने बुजविल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
बुरहानपुर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग मध्य प्रदेश महाराष्ट्रा व गुजरात राज्याला जुळतो.त्यामुळे रावेर ते सावदा दरम्यान या राष्ट्रीय महामार्गावर मोठे खड्डे पडले आहे.त्यात सार्वजनिक बांधकाम विभागा कडून हा राज्यमार्ग नॅशनल हायवे अथॉरिटी कडे वर्ग झाल्या पासुन यावर निधी आलेला नाही.त्यामुळे दुर्लक्षत होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर जागो-जागी खड्डे पडले असुन हायवेची संपर्ण चाळणी झाली आहे. जनतेचे व वाहनधारकांचे ये-जा करतांनाचे हाल लक्षात घेऊन श्रीराम फाऊंडेशन पुढे सरसावले असुन त्यांनी महामार्गावर पडलेले खड्डे बुजवले आहे.
राष्ट्रीय महामार्गचा डीपीआर अंतीम टप्यात
सुमारे आठ हजार कोटी खर्च करून लवकरच बुरहानपुर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग तयार होणार आहे. याचा डीपीआर अंतीम टप्यात असुन हा तयार करण्यात आलेल्या डीपीआर मध्ये महामार्ग रावेर शहराच्या मध्य भागातुन जाणार असून यासाठी ऊड्डानपुल प्रस्तावित असल्याची माहीती नॅशनल हायवे अथॉरिटीच्या सूत्रां कडून समजले त्यामुळे रावेर शहरातील बरीच अतिक्रम भुईसपाट होईल.जानेवारी २०२३ पासुन राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती आहे.
बळी जाऊ नये म्हणून बुजवले खड्डे; पाटील
रावेर ते सावदा दरम्यान या राष्ट्रीय महामार्गावर मोठे खड्डे पडले होते.महामार्गावर अनेक लहान मोठे अपघात सुध्दा झाले आहे.मागील आठवड्यात खड्डे चुकवतांना एका मोटरसायकलवर मागे बसलेल्या महीलेचा बळी गेला होता. नविन हायवे तयार होईल किंवा निधी येईल तो पर्यंत आम्ही पडलेले खड्डे जवळून बुजवत असल्याचे उद्योजक श्रीराम पाटील यांनी सांगितले.यावेळी सोपान साहेबराव पाटील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेमुद शेख यांनी श्रमदान करत खड्डे बुजवण्यास सहकार्य केले.
महामार्गावरील खड्डेमुळे गेले आहेत दोन बळी
बुरहानपुर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर रावेर ते सावदा दरम्यान खड्डे चुकवतांना मागील काही दिवसांमध्ये दोन बळी गेले आहे.तर अनेक किरकोळ अपघात झाले आहे.चोरवड नजिक देखिल यात महामार्गावर खड्डे पडले हे देखिल बुजवा अशी अपेक्षा वाहनधारकां मधुन व्यक्त होत आहे.