सावदा येथे कोरोना बाधितांची संख्या शंभरी पार

सावदा, प्रतिनिधी । आज शहरात एका महिलेसह तिघा पुरुषांचा कोरोना तपसणी अहवला पॉझिटिव्ह आला असून सावदा शहराने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा १०० चा आकडा पार करत १०३ चा  आकडा गाठला आहे.

आज रविवार १६ ऑगस्ट रोजी सावदा शहरात शनी मंदिर रोड २, स्वामीनारायण नगर १ , स्वामीनारायण मंदिर १, असे ४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात ५० वर्षीय, ३७ वर्षीय, २६ वर्षीय तरुण व ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. या चौघांसह १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सावदा येथे उपचार घेत आहेत. या वृत्तास मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.

Protected Content