पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दरवर्षीप्रमाणे आझाद चौकामध्ये श्री बालाजी महाराज रथोत्सवानिमित्ताने श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळेच्या उत्सव समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष खजिनदार यांची निवड करण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळेचे पैलवान स्वर्गीय कै रवींद्र भगवान चौधरी यांचे चिरंजीव योगेश उर्फ गोलू चौधरी यांची उत्सव समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
तसचे उपाध्यक्षपदी गोपाल भाऊ चौधरी उर्फ भगत व पैलवान स्वर्गीय कै.जितेंद्र सुराजी चौधरी यांचे लहान चिरंजीव उपाध्यक्षपदी स्वामी जितेंद्र चौधरी व श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळेचे पैलवान दिलीप चौधरी उर्फ वस्ताद यांचे चिरंजीव खजिनदार योगेश चौधरी उर्फ दादू व श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळेचे पैलवान रामदास दादा चौधरी यांचे पुतणे गणेश चौधरी यांची खजिनदार पाच जणांची बिनविरोध निवड करण्यात आली. आझाद चौक येथे सालाबाद प्रमाणे मीटिंग घेण्यात आली\
गेल्या वर्षी इंदुर येथून रथाचा देखावा आणण्यात आला होता व यावर्षीही मंडळाची संकल्पना आहे की पारोळ्यात या अगोदर आलेल्या नाही, हा असा आगळा वेगळा देखावा आणणार असल्याचे श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळेचे सल्लागार योगेश चौधरी यांनी मंडळाच्या मीटिंगमध्ये सर्व पदाधिकारी व सभासदांना सांगितले. यावेळी आझाद चौक परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ पैलवान व श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळेचे व श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी सभासद उपस्थित होते. यावेळी मीटिंगचे सूत्रसंचालन श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळेचे सल्लागार गजानन भाऊ ठाकरे यांनी केले.