रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीतील वादग्रस्त ठरलेल्या बीडीओ दिपाली कोतवाल यांच्या बदलीचे आदेश महाराष्ट्र शासनाने रात्री उशीरा काढले असून त्यांची बदली आता नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे करण्यात आली आहे.
रावेर पंचायत समितीच्या बिडीओ दीपाली कोतवाल यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला. प्रसार माध्यमांनी काढलेला गरीब लोकांच्या हक्काची योजना ‘व्यक्तीय शौचालय योजना’ मध्ये सुमारे दीड कोटीहून अधिक भ्रष्टाचार झाला होता. हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजले होते. या प्रकरणी अधिकाऱ्यांसह ३० च्यावर आरोपी तुरुंगात गेले होते. त्यानंतर जनहिताच्या कामावरून तत्कालीन जि. प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन विरुद्ध बिडीओ वाद देखील संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. माध्यमांनी काढलेल बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल आहे. शेष फंड प्रकरणी निळे निशान सामाजिक संघटनांनी केलेले आंदोलन देखील तालुकाभर चर्चेत होते. ब्युटीपार्लर योजना सुध्दा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गाजली होती. असा वादग्रस्त कार्यकाळामुळे अपेक्षित जनतेची कामे मागील तीन वर्षांत होऊ शकली नाहीत. बदली बाबत जनतेतून आनंद व्यक्त होत आहे.