पाचोरा येथे श्री १००८ महाराजा अग्रसेन जयंती उत्साहात 

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात श्री १००८ महाराजा अग्रसेनजी यांची ५१४५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

अग्रवाल समाज बांधव व भगिनींनी शहरातील शक्तीधाम येथे रांगोळी स्पर्धामध्ये विशेष करून महिलांनी नेसून आलेल्या साडीच्या डिझाईन सारखी रांगोळी काढली, सास बहू स्पर्धा शेठ आणि शेठानी स्पर्धा, व ड्रामा स्पर्धा, ग्रुप डान्स स्पर्धा सह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तसेच शहरातील श्री महाराजा अग्रसेनजी चौकी येथून सकाळी नऊ वाजता १८ बुलेट सोबत अनेक मोटरसायकल सह बाईक रॅली काढण्यात आली. ही बाईक रॅली श्री महाराजा अग्रसेन चौक येथून विठ्ठल मंदिर रोड, जामनेर रोड, अग्रवाल व्यापारी संकुलन, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भडगाव रोडवरील  अग्रस्तंभ चौक येथे सांगता करण्यात आली.

यावेळी अग्रवाल समाज बांधवांनी फेटे बांधून तर महिलांनी लाल रंगाच्या साड्या परिधान केलेल्या होत्या. तसेच अग्रस्तंभ फुलहारांनी सजविण्यात आले होते. अतिशय भक्तिमय वातावरणात जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तद्नंतर सायंकाळी भडगाव रोडवरील “शक्तीधाम” येथे विशेष करून समाजातील जेष्टनागरिकांचा ज्यांनी स्वातंत्र्याचा लढा पाहिला अशा ७५ वर्षांवरील नागरिकांचा शाल श्रीफळ व श्री महाराजा अग्रसेनजींची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले. श्री. १००८ महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त सर्व समाजाच्या वतीने १०८ जोडप्यांनी श्री महाराजा अग्रेनजी यांची महाआरती केली.

यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, शिवसेना नेत्या वैशाली नरेंद्रसिंह सूर्यवंशी, नरेंद्रसिंह सूर्यवंशी, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी भेट दिली. यावेळी अग्रवाल समाजाचे अध्यक्ष मोहन अग्रवाल, अग्रवाल समाज नवयुवा मंच अध्यक्ष निखिल मोर, अग्रवाल फ्रेंड्स ग्रुप अध्यक्ष सिताराम अग्रवाल, अग्रवाल महिला मंडळ अध्यक्षा संगिता अग्रवाल, अग्रलक्ष्मी मंडळाच्या अध्यक्षा टिना अग्रवाल, मा. अध्यक्ष जगदीश पटवारी, अनुप अग्रवाल, राजेश अग्रवाल, राजेश पटवारी, रमेश मोर, संजय सावा, रमेश अग्रवाल, कृष्णा अग्रवाल, गोपाल पटवारी, रवि मोर, किशन मोर, राजेश अग्रवाल, विवेक मोर, अजय गिंदोडिया, लौकीक अग्रवाल, योगेश अग्रवाल, गुड्डु  मोर, सागर पटवारी, राहुल गिंदोडिया, मुकेश अग्रवाल, अंकित अग्रवाल, पराग मोर, आदी समाज बांधव, भगिनी, युवकांसह अग्रवाल समाज बांधवानी अथक परिश्रम घेतले.

 

Protected Content