Home राजकीय शॉटगन पुन्हा फायर : म्हणे, ‘वन मॅन शो, टू मेन आर्मी’चा खेळ...

शॉटगन पुन्हा फायर : म्हणे, ‘वन मॅन शो, टू मेन आर्मी’चा खेळ खल्लास !


shatrugna sinha

पाटणा, वृत्तसंस्था | झारखंड विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या शैलीत टीकास्त्र सोडले आहे. ‘वन मॅन शो आणि टू मेन आर्मी’, तुमचा खेळ संपला आहे, अशा शब्दात शत्रुघ्न सिन्हा यांनी हिणवले आहे.

 

‘खामोश, झारखंड बीजेपी…. टाटा, बाय-बाय !’, असेही आपल्या खास शैलीत त्यांनी भारतीय जनता पक्षाला सुनावले आहे. पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि विद्यमान काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट करत ही टीका केली आहे. आता पुढे दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल आणि इतर अनेक ठिकाणांचा नंबर आहे, असे सिन्हा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सिन्हा यांनी झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांचा पराभव करणारे सरयू राय यांची प्रशंसा केली आहे.


Protected Content

Play sound