रेमिडीसीव्हरचा तुटवडा : भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

 

जळगाव, प्रतिनिधी ।  जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत असतांनाच  रेमिसिडीव्हर ह्या कोरोनावरील उपचारात वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनची कमतरता जाणवत आहे. रुग्णाच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल होत असल्यामुळे दि. १२ एप्रिल रोजी भाजपच्या शिष्टमंडळाने अभिजित राऊत ह्यांची भेट घेतली.

जळगाव जिल्हा भाजप अध्यक्ष राजूमामा भोळे व खासदार रक्षाताई खडसे , माजी आमदार स्मिताताई वाघ ,  आमदार संजय सावकारे, आमदार चंदुभाई पटेल ह्यांच्या नेतृत्वात भाजप शिष्टमंडळांने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी ह्यांनी ह्याविषयी सविस्तर चर्चा करून लवकरच रेमिडीसीव्हर उपलब्ध होणेकामी व त्याचा गैरवापर न होण्याकामी करण्यात येणाऱ्या उपाययोजना व निर्देशांबाबत माहिती दिली .

आमदार राजूमामा भोळे ह्यांनी ह्याविषयी निधीची अडचण असल्यास भाजपचे सर्व आमदार व खासदार ह्यासाठी निधी देण्यास तयार आहेत असेही प्रशासनास सांगितले. रेमिसिडीव्हरचा काळाबाजार करणाऱ्यांवर व विनापरवानगी वापरण्यांवर, गरज नसतांना वापर करणाऱ्यांवर  प्रशासन अंकुश ठेवणार असल्याचे ह्यावेळेस चर्चेअंती स्पष्ट करण्यात आले. ऑक्सिजन बेड ची संख्या हि वाढविण्यात आलेली असून कोरोनारुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे होणारे हाल हि थांबणार असल्याचे सूतोवाच ह्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण ह्यांनी केले . खासदार रक्षाताई खडसे ह्यांनी हि ह्याप्रसंगी विविध समस्या व त्यावरील उपाययोजना ह्याची व्यवस्थित मांडणी केली. भाजप शहर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी , शहर सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी,  जिल्हा भाजप वैद्यकीय आघाडी ग्रामीण सयोंजक डॉ. नरेंद्र ठाकूर , महानगर सयोंजक डॉ. धर्मेद्र पाटील, राजेंद्र घुगे पाटील ह्यांची हि उपस्थिती होती.

Protected Content