तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात सरासरी ६१.५१ टक्के झाले मतदान

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान झाले. यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात मतदान झाले. निवडणूक आयोगाने रात्री ८ वाजता मतदानाची आकडेवारी जाहीर केली. या ११ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात ६१.५१ टक्के मतदान झाले. सर्वात जास्त कोल्हापुरमध्ये ७०.३५ टक्के मतदान झाले तर सर्वात कमी बारामतीमध्ये ५६% मतदान झाले.

याव्यतिरिक्त लातूर- 60.18, सांगली- 60.95, हातकणंगले – 68.07, माढा- 61.17, धाराशिव – 60.91, रायगड- 58.10, रत्नागिरी- सिंधुदुर्ग – 59.23, सातारा- 63.05, सोलापूर- 57.61 मतदान झाले. पहिल्या टप्प्यातील ५ जागांवर ६३.७१ तर दुसऱ्या टप्प्यात ८ जागांवर ६२.७१ टक्के मतदान झाले होते. दोन्ही टप्प्यांपेक्षा तिसऱ्या टप्प्यात सुमारे १ ते २ टक्के कमी मतदान झाले.

Protected Content