जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या फुले मार्केटमधील पांचाली साडी या दुकानाला अचानक (Shop fire) आग लागली. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत माहिती अशी की, (Flower Market) फुले मार्केटमध्ये प्रसिद्ध असे पांचाली नावाने साड्यांचे दुकान आहे या दुकानाला शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग (Shop fire) लागली शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी तसेच नागरिकांनी घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवले त्यानुसार घटनास्थळी तातडीने महापालिकेचे अग्निशमन विभागाचे दोन बंब हजर झाले त्यापैकी एका अग्निशमन बंबातून पाण्याचा मारा करत अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत नेमके किती नुकसान झाले ते कळू शकलेले नाही मात्र दुकानातील साहित्य तसेच साड्या जळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.