भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एका भागात राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवार ३ मार्च रोजी रात्री ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातील एका भागात २८ वर्षीय तरुणीही वास्तव्याला आहे. दरम्यान ब्युटी पार्लरचा व्यवसाय करून ती आपला उदरनिर्वाह करते. १५ मे २०२३ रोजी या तरुणीची ओळख खालीच शहा सलीम शहा रा.जामनेर रोड, भुसावळ याच्याशी झाली. दरम्यान खाली शहा याने तरुणीला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला आणि जिवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर पीडित तरुणीने भुसावळ बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी खालील शाह सलीम शाह रा.जामनेर रोड भुसावळ याचा विरोधात सोमवारी ३ मार्च रोजी रात्री ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे करीत आहे.