धक्कादायक : व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील संजय नगर परिसरात एका महिलेला तिच्या मुलासह पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी सोमवारी ८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, धरणगाव शहरातील संजय नगर परिसरातील एका भागात २६ वर्षीय महिला आपल्या पती व मुलासह वास्तव्याला आहे. त्याच परिसरात राहणारा संशयित आरोपी भुषण सुकलाल महाजन याने महिलेचा अंघोळ करतांना व्हिडीओ काढून तो व्हिडीओ व्हायरल करण्याची  आणि मुलगा आणि पतीला जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्याच घरात घुसून अत्याचार केला.  जून २०२३ ते १६ डिसेंबर २०२३ दरम्यान त्याने ३ ते ४ वेळा महिलेवर अत्याचार केला. या अत्याचाराला कंटाळून महिलेने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी ८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भूषण महाजन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहे.

Protected Content