जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील खादगाव येथील तरुणी क्लाससाठी जाण्यासाठी कांग नदीच्या पुलावरून जात असतांनान तिला चक्कर येवून नदीपात्रा कोसळल्याने ती पाण्यात वाहून गेली. ग्रामस्थांनी शोध घेतला असता नदीपात्रातील काटेरी झुडूपाजवळ आढळून आल्याची घटना मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता समोर आली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पूनम ज्ञानेश्वर बाविस्कर (वय १८, रा. खादगाव ता.जामनेर) असे मयत तरुणीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील खादगाव येथे पूनम ही आई, वडील, भाऊ व बहिण यांच्यासह वास्तव्याला होती. एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ६वाजता पूनम सकाळी क्लासला जाण्यासाठी जामनेर तालुक्यातील खादगाव येथून निघाली होती. जामनेर तेथे ललवणी शाळेजवळील स्टॉप जवळ उतरून क्लाससाठी कांग नदीच्या पुलावरून जात होती. तिचे लक्ष प्रवाहात पाण्याकडे गेले व तिला चक्कर आल्यासारखे झाले. ती पुलावरून नदी पात्रात पडली व वाहून गेली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार नानासाहेब आगळे व पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या तीन तासात मुलीचे शव हे खादगाव जवळील नदीपात्रात काटेरी झुडपाजवळ अडकलेली दिसून आले. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.