जामनेर शेतकरी संघची सर्वसाधारण सभा उत्साहात

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शेतकरी सहकारी संघाची सर्वसाधारण सभेचे आयोजन रविवारी ५ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. ही सभा नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

 

याप्रसंगी शेतकरी संघ सभापती चंद्रकांत बाविस्कर, उपसभापती उत्तम राठोड, माजी जि.प. अध्यक्ष दिलीप खोडपे, गोविंद अग्रवाल, मार्केट कमिटी सभापती राजमल भागवत, तुकाराम निकम, नाना पाटील, रजनी नाईक, रमेश नाईक यांच्यासह शेतकरी संघ संचालक यांच्या उपस्थितीत वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या हिताचे काम केले जाणार असून त्याचबरोबर शेतकऱ्यांना खत, चार्जिंग पंप, ताडपत्री यासारख्या शेती दिले जात असून येणाऱ्या काळात ड्रोनच्या साह्याने फवारणी शेतकऱ्यांना करता यावी. यासाठी शेतकरी संघाच्या माध्यमातून ड्रोन उपलब्ध करून देण्याची ग्वाही सभापती चंद्रकांत बाविस्कर यांनी दिली. शेतकरी संघटना चालू वर्षात ४ लाख नफ्यात असून जामनेर शेतकरी संघाला “अ” वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. या सभेला मोठ्या संख्येने शेतकरी संघ संचालक व सभासद उपस्थित होते.

Protected Content