भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळातील गडकरी नगरात पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला करणाऱ्या तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी १ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आले आहे. पोलीसांच्या भीतीपोटी त्याने रेल्वेखाली आत्महत्या केली असावी अशी चर्चा परिसरात सुरू आहे. सुनिल मैलेलू वय-२२ रा. भुसावळ असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, पिता-पूत्राच्या कौटुंबिक वादानंतर मुलाकडून त्रास होत असल्याने त्रस्त पित्याने पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मदतीची मागणी केल्यानंतर मदतीसाठी गेलेल्या भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यावरच सुनिल मैलेलू या विकृत तरूणाने चाकूने हल्ला केला होता. ही घटना रविवारी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील गडकरी नगरात घडली होती. या घटनेत भुसावळ बाजारपेठ बाजारपेठचे हवालदार अक्षय चव्हाण जखमी होते. त्यानंतर सुनिल मैलेलू हा पसार झाला होता. याबाबत त्यांच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाहोता. दरम्यान, सुनिल मैलेलू याने भुसावळ शहरातील सुंदर नगरातील रेल्वे रूळाजवळ धावत्या रेल्वेखाली येवून आत्महत्या केल्याचे सोमवारी १ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता समोर आले. पोलीसांच्या भितीपोटी त्याने आत्महत्या केली अशी चर्चा परिसरातून केली जात आहे.