Home क्राईम धक्कादायक : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती !

धक्कादायक : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती !

0
111

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तिची ओळख गावातील विक्की रविंद्र कोळी (वय-३५) यांच्याशी सहा महिन्यांपुर्वी झाला होती. ओळखीचा गैरफायदा घेत विक्की याने अल्पवयीन मुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून अत्याचार केले. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच हा प्रकार घरी सांगितला तर तुझ्या भावाला मारेल अशी धमकी दिली. दरम्यान, पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विक्की रविंद्र कोळी याच्यावरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound