Home Uncategorized धक्कादायक : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; नराधमाला अटक

धक्कादायक : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; नराधमाला अटक

0
189


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी केलेल्या अत्याचारातून गर्भवती राहिल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनीवारी १९ जुलै रोजी रात्री १० वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मागील एक वर्षांपासून निखील लिलाधर कोळी वय २० रा. मोहन टॉकीजजवळ, जळगाव या नराधमाने पिडीत मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या वेळोवेळी अत्याचार करण्यात आला. या अत्याचारातून पिडीत मुलगी ही पाच महिन्याची गर्भवती असल्याचे १८ जुलै रोजी उघडकीला आले. या संदर्भात पिडीत मुलीच्या आईने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यानुसार शनीवारी १९ जुलै रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी निखील कोळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले हे करीत आहे.


Protected Content

Play sound