धक्कादायक : फेसबुकवर अश्‍लील फोटो टाकून अधिकार्‍याच्या पत्नीची बदनामी

जळगाव प्रतिनिधी | बनावट फेसबुक अकाऊंटवरून अश्‍लील फोटो अपलोड करून जिल्ह्यातील एका नगरपरिषदेतल्या अधिकार्‍याच्या पत्नीची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी , जळगाव जिल्ह्यातील एका शहरातील नगरपरिषदेत कार्यरत असणार्‍या अधिकार्‍याच्या पत्नीची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात विशेष म्हणून अज्ञात व्यक्तीने बनावट फेसबुक तयार करून चार ते पाच प्रकारचे फोटो अपलोड केले आहे. त्यात संबंधीत अधिकार्‍याच्या पत्नीचे नाव टाकले असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे.

याप्रकरणी संबंधीत अधिकार्‍यांनी जळगाव सायबर पोलीसात रात्री ८ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लिलाधार कानडे करीत आहेत.

Protected Content