मुंबई । सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या चौकशीतून समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणात आता अभिनेत्री दीपिका पडुकोन हिचे नाव समोर आले असून तिची याबाबत चौकशी होण्याची शक्यता आहे.
सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनचे धागेदोरे आता बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पादुकोणपर्यंत पोहोचले आहे. यापूर्वी श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान यांची नावेही या चौकशीत समोर आली आहेत. सोमवारी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) सुशांतसिंग राजपूत यांच्याकडे टॅलेंट मॅनेजर जया साहाशी चार तास चौकशी केली. यात व्हाटसअॅप चॅटमधून दीपिकाचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
या चॅटमध्ये डी, के कडून वस्तू मागत असल्याचे दिसून आले आहे. यातील डी म्हणजे दीपिका आहे आणि के ही जयाची सहकारी करिश्मा असल्याचा दावा करण्यात आला आहे. करिश्मा ही क्वान टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीची कर्मचारी असून या कंपनीने बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकार आणि अभिनेत्रींसह करारबध्द केले आहे. त्यामध्ये दीपिकाच्या नावाचा समावेश आहे. ही व्हाटसअॅप चॅटींग समोर आल्यानंतर दीपिक पादुकोणला लवकरच एनसीबी चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.