धक्कादायक : पेटवून घेतलेल्या सुनेचा उपचारादरम्यान मृत्यू; सासू ५० टक्के भाजल्या

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी गावानजीक असलेल्या टहाकळी गावात बुधवारी १९ जुलै रोजी मध्यरात्रीच सुमारास सुनेने अचानक स्वतःला पेटवून घेतल्याचे बघताच सासूही मदतीला धावली. या थरारक घटनेत सुनेचा मृत्यू झाला तर सासू ५० टक्क्याहून अधिक भाजल्या आहेत.

ममता सुधीर पाटील (२८), असे मयत सुनेचे तर लीलाबाई रमेश पाटील (५०), असे गंभीररित्या भाजलेल्या सासूचे नाव आहे.

 

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी १९ जुलै रोजी रात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान, ममता पाटील यांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सून आगीत होरपळत असल्याचे बघताच मदतीला सासू लीलाबाई पाटील यांनी तात्काळ धाव घेतली. सुनेला वाचविण्यात त्यांना अपयश तर आलेच पण स्वतः देखील या ५० टक्क्याहून अधिकच्या भाजल्या आहेत. घरात काही तरी भयंकर घडत असल्याचे लक्षात येताच नातेवाईकांसह गावकऱ्यांनी दोघांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, महिलेने स्वतःला का पेटवून घेतले याचं नेमकं कारण समोर समजू शकले नाही. या प्रकरणाची धरणगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Protected Content