चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून तिच्यावर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाआहे. हा प्रकार २५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडला आहे. या प्रकराबाबत मेहुणबारे पोलीसांना माहिती मिळाली. त्यानुसार महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे हे करीत आहे.