इंडिया आघाडीच्या नेत्यांनी गाजवलं शिवाजी पार्क

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा शनिवारी धारावी येथे समारोप झाल्यानंतर १७ मार्च रविवार रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीने मोठी सभा घेण्यात आली केले. या सभेत इंडिया आघाडीचे देशभरातील दिग्गज नेते शिवाजी पार्कवर आले होते. सभेपूर्वी खासदार राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. या सभेला इंडिया आघाडीतील १५ पक्षांचे नेते उपस्थित राहिले होते.

शिवाजी पार्कवरील सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, जम्मू काश्मीर पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती, काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रणिती शिंदे, आदी उपस्थित होते.

आमची लढाई कोणत्या एका राजकीय पक्षाच्या किंवा एका व्यक्तीच्या विरोधात नाही. तर अशा एका शक्तीच्या विरोधात आहे जी ईडी, सीबीआय, प्राप्तिकर खात्याचा उपयोग गुंडांसारखा करते. हीच शक्ती मुंबई विमानतळ एकाकडून घेऊन दुसऱ्याच्या हातात एका रात्रीत सोपवते. या शक्तीच्या विरोधात आपल्याला लढा उभारायचा आहे. मोदींची ५६ इंचाची छाती नाही, मोदी एक पोकळ व्यक्ती आहेत, नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय निवडणुका जिंकूच शकत नाहीत असा थेट हल्ला चढवत नरेंद्र मोदींकडे भ्रष्टाचाराची मक्तेदारी आहे अशी जोरदार टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली.

मोदी फक्त जनतेची दिशाभूल करू शकतात. मला तुरुंगामध्ये टाकण्याची धमकी दिली, पण मी घाबरलो नाही. इंडिया आघाडीतील नेतेही घाबरत नाहीत. ही आघाडी देशाचे रक्षण करण्यासाठी एकत्र आली आहे. नरेंद्र मोदींकडे भ्रष्टाचाराची मक्तेदारी आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून खंडणी वसुली केली जात आहे. पक्ष सोडणारे सर्वजण घाबरून भाजपात गेल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला. यावेळी त्यांनी नुकतेच काँग्रेस सो़डून भाजपत गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा नामोल्लेख न करता सांगितले की, आमचे एक वरिष्ठ नेता काँग्रेस सोडून गेले. या शक्तीशी लढण्याची माझ्यात हिंमत नाही, मला तुरुंगात जायचे नाही हे त्यांनी माझ्या आईजवळ -सोनिया गांधींकडे रडून सांगितले. असे हजारो जण त्यांचे पक्ष केवळ या शक्तीला घाबरून सोडून गेले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेलेही घाबरूनच पक्ष सोडून गेले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. राहुल गांधी यांनी मणीपूर ते मुंबई असा सहा हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला, त्यानिमित्ताने सर्व नेत्यांनी त्यांचे कौतुक केले. विद्वेष आणि हुकूमशाहीच्या विरोधातील राजकारणाच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, नरेंद्र मोदींचे कार्यक्रम श्रीमंतांसाठी आहेत तर काँग्रेसचे कार्यक्रम गरीब समाजासाठी आहेत. मोदींना प्रचंड अहंकार आहे. २०१४ साली देश स्वतंत्र झाला अशी मोदींची धारणा आहे. नेहरू, आंबेडकर यांचे योगदान ते नाकारतात. राहुल गांधी यांनी ज्या शक्तीचा उल्लेख केला ती शक्ती आरएसएसची शक्ती आहे, मनुवादाची शक्ती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, देशातील परिस्थितीत बदल आणण्याची गरज आहे. दबावतंत्राविरोधात आपल्याला पाऊले उचलावी लागतील. आश्वासन पूर्ण न करणाऱ्यांना सत्तेपासून दूर करायचे आहे. नरेंद्र मोदी यांनी देशाला खोटी गॅरंटी दिली. महात्मा गांधी यांनी मुंबईतून इंग्रजांविरोधात छोडो भारत घोषणा दिली होती. आता त्याच शहरातून छोडो भाजप असा नारा आपल्याला द्यावा लागले

शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले की, भाजप हा एक फुगा असून, दिल्लीतील हुकूमशाही तडीपार करण्यासाठी शिवाजी पार्क निवडण्यात आलं. भाजप फुगा आहे आम्ही त्यात हवा भरली होती. संपूर्ण भारतात यांचे दोन खासदार होते. आम्ही त्यात हवा भरली, आता त्यांच्या डोक्यात हवा गेली.मोदींच्या कुटुंबात ते आणि त्यांची खुर्चीच आहे. तोच मोदींचा परिवार आहे. घटना बदलण्यासाठी भाजपला ४०० पार हवे आहेत. आपली ओळख देश असली पाहीजे. व्यक्ती म्हणजे देश व्हायला नको. देश हाच माझा धर्म आहे. आपली लढाई लोकशाही आणि देश वाचवण्यासाठी आहे. कुणीही राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही. जेव्हा जनता एकत्र येते तेव्हा हुकूमशाह नष्ट होतो. यावेळी अबकी बार भाजप तडीपार, असा नारा उद्धव ठाकरे यांनी दिली

वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ज्या कंपन्यांचा नफा २०० कोटी रुपये आहे, त्यांनी १३०० कोटींचे निवडणूक रोखे कसे दिले? सरकारला याबद्दल प्रश्न विचारला पाहिजे. गृहमंत्री अमित शहा यांनी याचे उत्तर द्यावे

Protected Content