धक्कादायक ! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यात वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या फरासखाना पोलिस ठण्याजवळ कर्तव्य बजावत असतांना एका महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करत असतांना एकाने महिला पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

संजय फकिरा साळवे (रा. पिंपरी चिंचवड, मूळगाव- जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने दारूच्या नशेत महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जालन्याच्या प्रयत्न केला. घी घटना पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस ठाण्यासमोर शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. पुण्यात सध्या ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणी कारवाई तीव्र करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर देखील या प्रकरणी कारवाई सुरू होती. यावेळी एका वाहनचालकाला अडवण्यात आले असून त्याला कागद पत्र विचारले असता त्याने रागाच्या भरात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर थेट पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी चौकात उभ्या असलेल्या इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने आरोपीला अटक केली. यावेळी आरोपी हा दारूच्या नशेत होता. या प्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपीला अटक केली आहे.

पुण्यात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी चौकाचौकात मोठा बंदोबस्त ठेवला जात असून येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी केली जात आहे. शुक्रवारी रात्री फरासखाना पोलिस ठाण्याजवळ येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची चौकशी केली जात होती. यावेळी फरासखाना पोलीस स्टेशन समोर कामावर असतांना एका महिला पोलीस अधिकाऱ्याने एका व्यक्तीला थांबवले. आरोपी साळवे हा दारू पिऊन असल्याचे आढळले. यावेळी त्याच्याकडे कागदपत्रं मागण्यात आली. यावेळी दारूच्या नशेत असणाऱ्या आरोपीने संतांपून महिला पोलिसावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखावल्याने महिला कर्मचारी बचावल्या.

Protected Content