धक्कादायक ! पोलिस अधिकाऱ्याने महिला पोलिस कर्मचाऱ्यावर केला अत्याचार

हैदराबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तेलंगाणामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या सहयोगी महिला पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या वासनेची शिकार बनवले. आरोपीने बंदूकीचा धाक दाखवून महिलेवर जबरदस्ती केली. आरोपी पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पीडितेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती.

रिपोर्टनुसार, तेलंगाणा पोलीस दलात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक भवानी सेन यांना बुधवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर महिला कॉन्स्टेबलला बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना १६ जून रोजीची आहे. आरोपीने जयशंकर भूपलपल्ली जिल्ह्यातील एका गेस्ट रूममध्ये महिला पोलिसावर बलात्कार केला होता. कालसेवाराम पोलीस ठाण्यात तैनात महिला कॉन्स्टेबलने याबाबत तक्रार दाखल केली होती. पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले की, एसआय सेन याने रेप करण्यापूर्वी सर्विस रिवॉल्वर दाखवून तिला धमकी दिली होती. इतकेच नाही तर याबाबत कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशाराही दिला होता. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर आरोप सत्य असल्याचे आढळले. त्यानंतर आरोपी एसआयविरोधात कारवाई केली गेली. आजी एव्ही रंगनाथ यांनी सेन यांना कायमस्वरुपी सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content