बांधकामसाहित्य अंगणात पडल्याने शेजाऱ्यांमध्ये हाणामारी : परस्पर विरोधी गुन्हा दाखल

 

जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील फुफनगरी येथे बांधकामाचे मटेरियल अंगणात पडल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबामध्ये हाणामारी झाल्याची घटना २३ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी आज शनिवारी तालुका पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबांनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

 

फुफनगरी येथे ओमप्रकाश बाळकृष्ण जाधव वय २२ हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार असे की, २३ रोजी सकाळी जाधव यांच्या घराच्या अतीक्रमणमध्ये असलेल्या ओट्या वीटासिमेंट मटेरीयल हे शेजारी राहणार्‍या चंदू लक्ष्मण पाटील यांच्या अंगणात पडल्याच्या कारणावरुन चंदू पाटील यांच्यासह हर्षल रामचंद्र पाटील व मालुबाई लक्ष्मण पाटील या तिघांनी ओमप्रकाश जाधव यांच्या पत्नीस चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. याचवेळी हर्षल पाटील याने ओमप्रकाश जाधव यांच्या डोक्यात विट मारुन दुखापत केली. यात जाधव हे जखमी झाले. याप्रकरणी आज शनिवारी सकाळी ओमप्रकाश जाधव यांच्या फिर्यादीवरुन चंदू लक्ष्मण पाटील , हर्षल रामचंद्र पाटील व मालुबाई लक्ष्तण पाटील तिघे रा. फुफनगरी या तिघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

 

तर दुसर्‍या घटनेत हर्षल रामचंद्र पाटील वय २४ याने दिलेल्या तक्रारीनुसार असे की, अतिक्रमणमध्ये असलेल्या ओट्याचे तुटलेले सिमेंट व विटाचे तुकडे हर्षल पाटील यांनी ओमप्रकाश जाधव यांना उचलण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने ओमप्रकाश जाधव व त्यांची पत्नी हर्षला जाधव यांनी हर्षल पाटील यांच्या घरात घुसून त्यांच्यासह एकाला जाणाला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी ओमप्रकाश जाधव यांच्यासह त्यांची पत्नी हर्षला जाधव या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास पाटील हे करीत आहेत

 

 

 

 

 

 

Protected Content