जिल्हा बँकेच्या शाखेचे नूतन वास्तूमध्ये स्थलांतर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दुध फेडरेशन शाखेचे आज याच भागातील नुतन वास्तूत स्थलांतर करण्यात आले.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दुध फेडरेशन शाखेचे आज याच भागातील नुतन वास्तूत स्थलांतर करण्यात आले. जिल्हा दुध संघाच्या अध्यक्षा सौ मंदाताई खडसे व जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा सौ रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या हस्ते फित कापुन बँक शाखेचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी दुध संघ संचालक जगदीश बढे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख , दुध संघाचे कार्यकारी संचालक श्री लिमये, अशोक लाडवंजारी, डॉ. अभिषेक ठाकुर, बी. जे. टोके, सुरेश राणे आदींची उपस्थिती होती. (jdcc bank jalgaon)

Protected Content