अमळनेरात कोरोना बाधितांचे शतक; जिल्ह्यातील ३२ पैकी ३१ रूग्ण अमळनेरचे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज अजून ३२ रूग्ण आढळले असून यातील ३१ जण हे अमळनेरचे आहेत. अमळनेर येथील रूग्णांची संख्या शंभरावर गेल्याने तेथील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

जळगाव जिल्ह्यातील सर्वाधीक कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण अमळनेर येथे आहे. यात आज पुन्हा नव्याने भर पडली आहे. या अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयाने आज जाहीर केलेल्या प्रेस नोटमध्ये एक बाधीत आढळ्याचे नमूद केले आहे. या प्रेस नोटनुसार- जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव येथे स्वॅब घेतलेल्या 103 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 71 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून बत्तीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेले रूग्णांमध्ये अडावद, चोपडा येथील एक, अमळनेर येथील एकतीस असे एकूण बत्तीस रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 157 इतकी झाली असून त्यापैकी अठरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. अमळनेर येथील संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्नांची शर्थ केली असून शहरात अनेक कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. तथापि, रूग्ण संख्या कमी होत नसल्याचे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, चोपडा तालुक्यातील अडावद येथील बाधितांची संख्या देखील वाढीस लागल्याचे आता दिसून येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content