मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणूकीच्या तोडांवर अजित पवार गटाला मोठे धक्के बसत आहे. सिंदखेड राजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे सिंदखेड राजा मतदारसंघातील आमदार राजेंद्र शिंगणे पुन्हा शरद पवार गटात परतले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.
आपण शरीराने अजितदादा सोबत आणि मनाने मात्र शरद पवार साहेबांसोबत असल्याचे सुतोवाच अनेक वेळा करणारे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी पुन्हा एकदा ‘मोठ्या साहेबां’कडे अर्थात शरद पवार यांच्याकडे परतले आहे. त्यामुळे सिदखेडराजा विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. आमदार शिंगणे शरद पवार गटातच राहतील अशी दाट शक्यता होती. मात्र या शक्यता चुकीच्या ठरवीत शिंगणे जिल्हा बँकेला ३०० कोटींच्या सॉफ्ट लोन च्या मागणीसाठी त्यांनी अजित दादांच्या गोटात सामील झाले. मात्र तिथेही त्यांचे मन काही रमले नाही. आपण शरद पवाराना मानतो हे काही त्यांनी लपवून ठेवले नाही. आता ते पुन्हा राष्ट्रवादीत परतले आहे.