पाचोरा प्रतिनिधी । आजवर भाजपने शिवसेनेला विचारात घेतले नसल्यामुळे आगामी निवडणुकीत या पक्षाचा प्रचार न करण्याची घोषणा आज येथील शिवसेनेने केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर, आज येथील शिवसेनेने पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करतांना भाजपचा प्रचार न करण्याचा निर्णय जाहीर केला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील आणि दिनकर देवरे यांनी या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाला की, पाचोरा जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपा प्रचार शिवसेना करणार नाही असा ठराव शिवसेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधीने यांनी केलेला आहे. गत पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती करून निवडणूक लढवली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तोडून निवडणूक लढवली आहे आणि भाजपाने जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला डावलून सत्ता काबीज केली आहे. यामध्ये शिवसेनेचे पंधरा जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले असून प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य तीस ते चाळीस हजार मतदारांचा लोक प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र त्यांना कुठलाही विचारात घेतलेले नाही. तसेच पाचोरा पंचायत समितीत काँग्रेसला सोबत घेऊन पंचायत समिती सत्ता काबीज करण्यात आलेली आहे. आमदार किशोर पाटील यांनी प्रांत अधिकारी तहसीलदार व बीडीओ यांच्या उपस्थितीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणी टंचाई आढावा बैठक आयोजित केली असता त्या बैठकीत सभापतींनी ग्रामसेवकांना येऊ दिले नाही. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य व सरपंच हे पंचायत समितीवर ग्रामसेवकांना बोलवण्यासाठी गेले असता त्यांच्यावर सभापतींनी नामदार गिरीश महाजन त्यांच्या दबावाखाली शासकीय कामात अडथळा केल्याबाबत शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकारी व खोट्या गुन्हा दाखल करण्यात आला. दिवाळीच्या सणामध्ये या पदाधिकार्यांना आपल्या परिवारासोबत दिवाळीसारखा सण साजरा करून फटाके फोडता आले नाही मग आता आम्ही भाजपाचे फटाके का म्हणून फोडायचे ? असा प्रश्न त्यांनी विचारला.
ते पुढे म्हणाले की, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादी सोबत आघाडी करून निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत शिवसेनेचे दहा संचालक निवडून आले त्यानंतर नामदार गिरीश महाजन यांनी सहाय्यक निबंधक व पणन यांच्याकडे दबाव टाकून ८ संचालक अपात्र करण्यात आले आणि राष्ट्रवादी संचालकांन सोबत घेऊन सत्ता काबीज केली आहे. तसेच पाचोरा नगरपालिका लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपाने आघाडी सोबत युती करून निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल हे निवडून आले व त्यांच्या जात पडताळणी बाबत राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार यांनी तक्रार केली त्यात आमदार गिरीश महाजन यांनी जिल्हा अधिकारी यांच्यावर दबाव टाकून नगराध्यक्ष यांना अपात्र घोषित करण्यात आले. यामुळे भाजपचा प्रचार करणार नाहीत असा ठराव शिवसेनेचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केला आहे. भाजपने केलेल्या अन्यायाबाबत आमदार गिरीश महाजन भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांनी खुलासा द्यावा. तोपर्यंत शिवसेनेचा कुठलाही पदाधिकारी व कार्यकर्ता लोकसभा उमेदवारीचा प्रचार करणार नाही अशी माहिती आज जि. प. सदस्य रावसाहेब पाटील व अॅड. दिनकर देवरे पत्रकार परिषद बोलताना दिली. या आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, जि.प. सदस्य पदमसिंग पाटील, नगरसेवक सतीश चढे, डॉ भरत पाटील, अरुण पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पहा : शिवसेना पदाधिकार्यांची संतप्त भूमिका.