मुंबई प्रतिनिधी । युतीवर शिक्कामोर्तब झाले असून पालघरची जागा ही शिवसेनेला मिळणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.
विद्यमान राजकीय स्थिती पाहता युती ही अपरिहार्य असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या लक्षात आले आहे. यामुळे आता भाजप २५ तर शिवसेना २३ जागांवर लढणार असून युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गत लोकसभा निवडणुकीत भाजप २६ तर शिवसेना २२ जागांवर लढली होती. आता शिवसेनेला पालघरची जागा मिळणार आहे. अर्थात, भाजपने जागा वाटपाबाबत नमते घेतल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत फिप्टी-फिप्टी अर्थात दोन्ही पक्ष प्रत्येकी १४४ जागा लढविण्यावरदेखील एकमत झाले आहे. यामुळे शिवसेनेने भाजपला युतीची बोलणी करतांना नमविल्याचे दिसून येत आहे. युतीवर एकमत झाले असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.