मुंबई । आम्हाला हाच निकाल अपेक्षित होता, असे नमूद करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बाबरी मशीद प्रकरणी देण्यात आलेल्या निकालाचे स्वागत केले आहे.
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्यासह सर्वच्या सर्व म्हणजे ३२ संशयितांची निर्दोष मुक्तता केली असून शिवसेनेने याचे स्वागत केले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांचे अभिनंदन केले. राममंदिराच्या भूमिपूजनावेळीच बाबरी खटला संपला होता. आम्हाला हाच निर्णय अपेक्षित होता. सीबीआयच्या निर्णयाचे शिवसेनेकडून स्वागत करतो, असे राऊत म्हणाले. राऊत यांनी लखनौ विशेष कोर्टाचे आभार मानले. २८ वर्षांनंतर बाबरी खटल्याच्या आलेल्या निर्णयाचे स्वागत करतो, असे राऊत यावेळी म्हणाले.