चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत येथे खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचा मेळावा पार पडला.
शिवसंपर्क अभियान टप्पा क्र-२ च्या निमित्त चोपडा येथे मेळावा पार पडला. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी खासदार धैर्यशील माने तर प्रमुख पाहुणे म्हणून सहसंपर्क प्रमुख तथा माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, चोपडा विधानसभा संपर्कप्रमुख सुधीर गडकरी, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, दिंडोरी विधानसभा क्षेत्र प्रमुख राकेश कांबळी, लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष नंदकुमार राणे, उपाध्यक्ष संदीप चिरफाडे, जळगावचे माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, उपजिल्हाप्रमुख मुन्ना पाटील, प्रा.उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, शहरप्रमुख आबा देशमुख, नरेश महाजन, गोपाळ चौधरी, सुकलाल कोळी, दीपक चौधरी, हरीश पाटील, एम.व्ही. पाटील, सागर ओतारी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शिव संपर्क अभियानांतर्गत मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भेटीस पाठवले. या अभियानात तक्रारींचा पाढा न वाचता आपले मत मांडा, आपल्या समस्या नक्कीच मातोश्रीवर मी घेऊन जाईल, असेही माने यांनी सांगितले. तसेच शिवसेनेचा विचार हा शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.