धनंजय मुंडे यांचा मोठा घोटाळा : दमानियांचा आरोप !

मुंबई-वृत्तसेवा | धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्री असतांना विविध वस्तूंच्या खरेदीत तब्बल पावणे तीनशे कोटी रूपयांचा घोळ केला असून त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी आज केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या आज काही तरी मोठा गौप्यस्फोट करणार असे त्यांनी आधीच जाहीर केले होत्ो. या अनुषंगाने त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली. यात त्यांनी मुंडे यांनी जवळपास पावणे तीनशे कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला.

या संदर्भात अंजली दमानिया म्हणाल्या की, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, कापूस जमा करण्याच्या बॅगा आदींमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. यात सर्व वस्त्ूा या अतिशय वाढीव दराने घेण्यात आलेल्या आहेत. यामुळे राज्य शासनाचे तब्बल पावणे तीनशे कोटी रूपये वाया गेले असून ही रक्कम धनंजय मुंडे यांनी हडप केली आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी मोठा घोटाळा केला असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. तर, भगवानगडाने देखील धनंजय मुंडे यांना जाहीर केलेला पाठींबा काढून घ्यावा असेही त्या म्हणाल्या. आता अंजली दमानिया यांच्या सनसनाटी आरोपावर नेमकी काय प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content