मुंबई प्रतिनिधी । काल जळगाव लोकसभा मतदारसंघातील जिल्हा प्रमुख जाहीर झाल्यानंतर आज शिवसेनेच्या रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी जाहीर करण्यात आले असून यात सहसंपर्क प्रमुखपदी माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे तर जिल्हा प्रमुखपदी आ. चंद्रकांत पाटील व समाधान महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, कालच शिवसेनेत खांदेपालट करण्यात आला. यात जिल्हाप्रमुख म्हणून माजी महापौर विष्णू भंगाळे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. हर्षल माने यांची नियुक्ती करण्यात आली. तर मावळते जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांना सहसंपर्क प्रमुख करण्यात आले.
काल जळगाव लोकसभा मतदारसंघातील जिल्हा प्रमुख जाहीर झाल्यानंतर आज शिवसेनेच्या रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी जाहीर करण्यात आले असून यात सहसंपर्क प्रमुखपदी माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे तर जिल्हा प्रमुखपदी आ. चंद्रकांत पाटील व समाधान महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे जामनेर, मुक्ताईनगर व रावेर मतदारसंघ तर समाधान महाजन यांच्याकडे भुसावळ व चोपडा मतदारसंघाचीच जबाबदारी सुपुर्द करण्यात आली आहे. तर प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना बढती देण्यात आली आहे.