उधारीचे पैसे मागितल्याने तरूणाच्या डोक्यात टाकली कुर्‍हाड !

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील विठ्ठल मंदिर वार्डातील रहिवाशी यांनी १५ बंगला भागातील महिलेला उधार दिलेले पैसे परत मागितले. या गोष्टीचा राग आल्याने महिला व मुलाने तरुणांच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी केल्याची घटना दुपारी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी धिरज निळकंठ पाटील वय 31 राहणार विठ्ठल मंदिर वार्ड,हेमंत फालक यांच्या घरी भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादिवरून दिनांक 3/6/2021 रोजी दुपारी फिर्यादी यांनी सीता बाविस्कर यांना 2000 रुपये उधार दिले होते.फिर्यादी यांनी मगितल्याच्या कारणावरून सीता बाविस्कर यांचे पती पूर्ण नाव माहीत नाही व त्यांचा बंटी बाविस्कर यांना राग आल्याच्या कारणावरून लोखंडी कुऱ्हाडीने फिर्यादीच्या डोक्यावर मध्यभागी मारून दुखापत केली.

 भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला आरोपी सीता बाविस्कर व बंटी बाविस्कर दोघे विरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, प्रभारी बाबासाहेब ठोंबे यांच्या आदेशावरून गुरन 232/2021भा.द.वि.कलम 326,504, 506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित आरोपी बंटी बाविस्कर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ नेव्हील बाटली करीत आहे.

 

Protected Content