अपहृत बालिकेवर झाला अत्याचार; नराधमाला कोठडी

जळगाव प्रतिनिधी । दोन चिमुरड्यांच्या अपहरण प्रकरणी पकडण्यात आलेल्या नराधमाने यातील बालिकेवर अत्याचार केल्याचे उघड झाले असून कोर्टाने त्याला पोलीस कोठडीत रवाना केले आहे.

याबाबत वृत्त असे की, सुनील पडत्या बारेला (रा. चिरमलीया, ता. वारला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) याने गोपाळपुरा भागात राहणार्‍या एका कुटुंबीयांकडे येऊन दोन बालकांचे अपहरण केले होते. यानंतर त्याला याला १ जून रोजी अमळनेर येथून अटक केली. त्याच्याकडून ताब्यात घेतलेल्या १० वर्षीय मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मुलीवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे त्याच्या विरूध्द अपहरणासह बाल लैंगीक अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान नराधम सुनील पडत्या बारेला याला पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायाधिशांनी त्याला ८ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.