रावेरात रंगणार शिवलिला पाटीलताई यांचे किर्तन !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तरूणाईच्या आयकॉन असलेल्या ख्यातनाम कीर्तनकार हभप शिवलीलाताई पाटील यांच्या किर्तनाचे आज शहरात आयोजन करण्यात आले आहे.

रावेर शहरात  ह.भ.प कु शिवलिला पाटील यांचे जाहीर किर्तनाचा कार्यक्रम आज सायंकाळी आयोजित करण्यात आले आहे.युवतींच्या प्रेरनास्थान असलेल्या हभप पाटील जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यात प्रथमच येत आहे.

युवा किर्तणकार असलेले बिग बॉस मराठीच्या माध्यमातुन चर्चेत असलेल्या ह.भ.प शिवलिला पाटील यांचे रावेर शहरातील मंगलम लॉन येथे  सायंकाळी उद्योजक श्रीराम पाटील यांच्या वाढदिसवा निमित्त त्यांचा जाहीर किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यातील महिला युवती युवक पुरुषांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन श्रीराम फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहेत.

शिवलीलाताई पाटील या प्रख्यात किर्तनकार असून त्या आपल्या किर्तनात समाज प्रबोधनपर बाबींना प्राधान्य देत असतात. सोशल मीडियातून त्यांचे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले आहेत. यामुळे त्यांच्या किर्तनाला मोठी जनसमुदाय असतो. यातच रावेरच नव्हे तर जिल्ह्यात त्या पहिल्यांदा येणार असल्याने या सोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Protected Content