‘चंद्रयान-३’चे पुन:प्रक्षेपण : विद्यार्थ्यांनी घेतला आनंद

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील ऍड. ड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘चंद्रयान-३’ या ऐतिहासिक मोहिमेचे आज विद्यार्थ्यांना ओ.एच. पी. (ओव्हर हेड प्रोजेक्टर) वर पुन:प्रक्षेपण दाखविण्यात आले.

 

’चंद्रयान-३’ ही मोहीम यशस्वी करून दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगात भारत हा पहिला क्रमांकाचा देश ठरला आहे.   विद्यार्थ्यांनी ही चंद्रयान मोहीम पाहण्याचा मनमुराद आनंद लुटला.

 

याप्रसंगी विज्ञान समिती प्रमुख विशाल सूर्यवंशी यांनी ’चंद्रयान-३’ ची  विस्तृत माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रक्षेपण समिती प्रमुख ऋतुजा जोशी व अतुल भदाने, नितेश परब, स्वप्नाली धनगर, प्रियंका साळी, प्रियंका अहिरराव या शिक्षकांनी सहकार्य केले.

 

यावेळी शाळेचे सचिव प्रा शाम पाटील संचालक पराग पाटील, प्राचार्य नीरज चव्हाण, उपप्राचार्या अश्विनी चौधरी व आदी उपस्थित होते.

Protected Content