…आणि शिरीषदादा व साहेबरावदादांनी धरला एकत्रीत ठेका ! (व्हिडीओ)

0

अमळनेर प्रतिनिधी । एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असणारे आमदार शिरीषदादा चौधरी आणि माजी आमदार साहेबराव दादा पाटील या दोन्ही मान्यवरांनी आज शिवजयंतीच्या मिरवणुकीत एकत्रीत ठेका धरल्याचे चित्र पाहून अमळनेरकर सुखावले.

हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृह पासून व त्यांच्या भव्य पुतळ्यापासून आजी माजी आमदारांनी अमळनेर तालुक्यातील सर्व शिवभक्तांनी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. याचे औचित्य साधून आमदार शिरीषदादा चौधरी ,माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, हिरा उद्योग समुहाचे अध्यक्ष डॉ रवींद्र चौधरी यांनी जोरदार ठेका धरला. याला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.

दरम्यान, शिवजयंतीच्या मिरवणुकीत अमळनेर तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार साहेबराव पाटील ,हिरा उद्योगसमूहाचे डॉक्टर रवींद्र चौधरी, राष्ट्रवादीच्या महिला प्रमुख तिलोत्तमा पाटील, सुलोचना बाग विक्रांत पाटील, रवींद्र पाटील, प्रवीण पाठक, सुनील भामरे, आमदार शिरीष चौधरी मित्र परिवाराचे सर्व शिवभक्त, माजी आमदार साहेबराव पाटील यांचे सर्व कार्यकर्ते सर्व अमळनेर तालुक्यातील सर्व पक्षांचे पदाधिकारी युवा वर्ग यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. तर आजी-माजी आमदारांचा ठेका हा तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. शिवजयंतीच्या दिवशी राजकीय वैमनस्य विसरण्याचा हा उमदेपणा अमळनेरकरांना भावला आहे.

पहा– अमळनेरच्या आजी-माजी आमदारांचा बेधुंद ठेका !

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!