शिवजयंती दिनी बंधारा दुरूस्तीचे भूमिपुजन

पाचोरा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे अवचित्त साधून जलयुक्त शिवार या योजने मधून भोजे व चिंचपुरे या दोन गावातील नदीवर बंधारा दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन आज जि. प.सदस्य मधुकर काटे यांच्याहस्ते करण्यात आले.

पिंपळगांव शिंदाड गटाचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांनी जवळपास २५ वर्षांपासून प्रलंबीत असणार्‍या बंधार्‍याच्या दुरूस्ती कामास प्रारंभ केला. याप्रसंगी भाजयुमो तालुका सरचिटणीस परेश अशोक पाटील, विजय कडू पाटील, सौ.निर्मला राजेंद्र हिवाळे, सौ. शोभा विनोद पाटील, यशवंत पवार, डॉ. शिवाजी पाटील निलेश उभाळे, शीतल पाटील, बाळू पाटील भोजे, बाळू पाटील चिंचपुरे, अनिल महाजन, विनोद महाजन व मिलिंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थीतीत हा कार्यक्रम पार पडला. या कामासाठी मधुभाऊ काटे यांच्या विशेष प्रयत्नाने रु.२८ लाख मंजूर झाले. या बंधारा दुरुस्तीची मागणी ही या दोन्ही गावातील शेतकर्‍यांची बर्‍याच दिवसांची होती असे तेथील शेतकर्‍यांनी बोलून दाखवले. या कामामुळे त्या नदीला व जवळच्या विहिरींना पुनर्जीवन मिळणार आहे.

Add Comment

Protected Content