पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त पाचोरा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन १८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता शहरातील आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरापासून मशाल यात्रा ही सार्वजनिक उत्सव समिती अध्यक्ष आ. किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जामनेर रोड, मानसिंगका काॅर्नर, ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात पर्यंत काढण्यात आली.
१९ फेब्रुवारी रोजी सकाळी शासकीय शिव मानवंदना, जिजाऊ वंदना महाराष्ट्र गीत, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगरपालिका, प्रकाश टाॅकीज, हुसेनी चौक, आठवडे बाजार, महात्मा गांधी चौक, जामनेर रोड ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, माॅंसाहेब जिजाऊ व मावळे यांची वेशभूषा परिधान केलेल्यांना बक्षिस वितरण, सर्व शाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना सन्मान पत्र, विविध चौकात शिवपुजन, छत्रपती शिवाजी महाराज चौकात अल्पोपहार व दुध वाटप, विविध प्रात्यक्षिके, लेझीम पथक, व महापुरुषांच्या वेशभूषा, विविध खेळांचे प्रात्यक्षिक या प्रकारे विविध कार्यक्रमांनी पाचोरा शहरात उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.