खडके प्राथमिक विद्या मंदिरात शिवजयंती उत्साहात साजरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | “सज्जनांचा कैवारी व दुर्जनांचा कर्दनकाळ” असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात “स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली”. ही नाट्यछटा खडके विद्या मंदिरातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी साकारली .यात सुशील अत्तरदे याने मी शिवाजी बोलतोय हा एकपात्री प्रयोग करुन महाराजांची भूमिका साकारली. तसेच ,आदित्य अहिराणे व देव्यानी परीहार या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची माहिती सांगितली. उपशिक्षक श्री. किरंगे सर श्रीम. कांचन पाटील, श्रीम. शीला नारखेडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगांवर माहिती सांगितले.

“शिवाजी महाराज की जय “, “जय भवानी जय शिवाजी” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय पाटील सर ज्येष्ठ शिक्षक श्री. सुनील पाटील सर श्रीमती धुमाळ मॅडम उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले शेवटी कार्यक्रम प्रमुख स्वाती चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले.

Protected Content