फुले बिग्रेडच्या तालुका अध्यक्षपदी दिपक महाजन

WhatsApp Image 2020 01 14 at 7.56.40 PM

धरणगाव, प्रतिनिधी | अनोरे येथील दिपक राजाराम महाजन यांची राष्ट्रिय फुले ब्रिगेडच्या धरणगाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

दिपक महाजन यांना राष्ट्रीय फुले ब्रिगेडच्या धरणगाव तालुका अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष नामदेव भुजबळ व जिल्हाध्यक्ष सुदाम महाजन यांनी दिले आहे. दिपक महाजन यांच्या नियुक्तीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर महाजन यांनी समाजातील युवकांना संघटित करून विविध समस्या सोडवण्याचा मानस व्यक्त केला आहे.

Protected Content