रानडूक्कर पकडण्यासाठी शेतात ठेवलेल्या जिलेटिनचा स्फोट !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रानडूक्कर पकडण्यासाठी शेतात ठेवलेल्या फटाक्याच्या दारूच्या गाठोड्याला हात लागून स्पोट झाल्याने एका महिलेच्या हाताच्या पंजाला गंभीर दुखापत झाली असुन ती फटाक्याची दारू ठेवणार्‍या विरूध्द पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेतील जखमी महिलेवर जळगाव येथे उपचार सुरू आहे.

याबाबत पाचोरा पोलिसात लासगाव येथिल श्रावण कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुन सिमाबाई कुंभार ही शेती काम करत असुन भाऊ विठ्ठल बन्सी कुंभार याची लासगांव शिवारात शेत गट नं. २३७ मध्ये २ बिघे अशी शेतजमीन आहे. तसेच त्यांचे शेताचे बाजुलाच माझीसुध्दा २ बिघे शेतजमीन आहे. आज ५ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजेचे सुमारास आम्ही घरातील सर्वजण हे विटभट्टीचे काम करित असतांना भाऊ विठ्ठल कुंभार याची पत्नी व सुन सिमाबाई कुंभार असे त्यांचे शेतात कपाशी वेचण्याचे काम करित असतांना काहीतरी फटाका फुटल्यासारखा स्फोटाचा आवाज आला म्हणुन आम्ही सर्वजण भाऊ विठ्ठल कुंभार याचे शेताकडे धावत गेलो असता त्याठीकाणी सुन सिमाबाई हिचे डावे हाताचे पंजास जबर दुखपात होऊन हाताची बोटे छन्न विछीन्न होवुन रक्त बंभाळ झालेले दिसले तेव्हा आम्ही सुन सिमा हिस विचारपुस करता तिने सांगितले की, कपाशी वेचतांना एक लहान गाठोडी जमीनीवर पडलेली होती म्हणुन सदरच्या गाठोडी मध्ये काय आहे ? ते पाहण्यासाठी ऊचलली असता त्या गाठोडीचा अचानक स्फोट झाला आहे. असे सुनबाई सिमाबाई कुंभार हिने आम्हाला सांगीतले तेव्हा तिचे हातास जखमा होऊन त्यातुन आधिक रक्तस्त्राव होत असल्याने तिस उपचारासाठी जळगांव येथे दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आम्ही आमचे गांवात बाहेरुन कापुस वेचणीसाठी आलेली मध्य प्रदेश येथील लोकांकडे गेलो असता त्यातील एक इसम गयाराम शिवरलाल चव्हाण रा. पारदीपुरा राला नंदगांव जि. सिहोर
(मध्य प्रदेश) यांस मी यापुर्वी रानडुकरे पकडतांना पाहिले होते. त्यास मी तुम्ही रानडुक्कर कसे पकडता ? असे विचारपुस करता तो तेथुन पळुन जाण्याचा प्रयत्न करित असतांना आम्ही त्यास पकडले तेव्हा त्यास विचारपुस केली असता त्याने सांगितले की, मीच शेतात डुक्करे पकडण्यासाठी एका कापडी गाठोडीत फटाक्याची दारु भरुन तुमचे शेताचे परीसरात ठेवलेल्या होत्या व नंतर त्या कोठे ठेवल्या हे मला आठवत नसल्याने ते मला जमा करता आले नाही. अशी आम्हाला त्याने माहीती दिली तरी आमचे भावाचे लासगांव शिवारातील शेत गट क्रं. २३७ मध्ये गयाराम शिवरलाल चव्हाण रा. पारदीपुरा राला नंदगांव जि. सिहोर (मध्य प्रदेश) याने आमच्या परवानगी शिवाय शेतात अनाधिकृतपणे प्रवेश करुन वराह (रानडुकरे) पकडण्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्याचे जवळील स्पोटक पदार्थाची गाठोडी ही शेतात ठेवली व सदरची गाठोडी ही माझ्या सुनेने हातात उचलल्याने सदर गाठोडीचा स्पोट होऊन तिच्या डाव्या हातास गंभिर दुखापती झाल्या आहेत. सदर दुखापतीस व घटनेस गयाराम शिवरलाल चव्हाण रा. पारदीपुरा राला, नंदगांव जि. शिहोर (मध्य प्रदेश) हाच कारणीभुत असुन श्रावण कुंभार यांचे फिर्यादीवरून गयाराम चव्हाण याचे विरुध्द पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे करित आहे.

Protected Content