मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त सामनात आल्यानंतर आता ते शिवसेनेतच असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
मावळचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या अभीनंदनाचे फलक लावल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा दैनिक सामनाच्या माध्यमातून करण्यात आली होती. यामुळे आता शिवसेनेत हकालपट्टीचे सत्र सुरू होणार असल्याची चर्चा सुरू होती.
यानंतर मात्र शिवसेनेतर्फे एका पत्राच्या माध्यमातून शिवाजीराव अढळराव पाटील हे पक्षातच असून दैनिक सामनातील वृत्त हे अनावधानाने छापण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे आता मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.