विधानसभाध्यक्षपदासाठी विरोधकांची मतदानाची मागणी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा अध्यक्षपदाची निवड ही आवाजी नव्हे तर प्रत्यक्षात मतमोजणीने घेण्यात यावे अशी मागणी आज विरोधकांनी केली असून यामुळे आता मतदान होणार आहे.

महाविकास आघाडीतर्फे राजन साळवी तर भाजप व शिंदे गटातर्फे राहूल नार्वेकर यांच्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. यात आज भाजपचे ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत पाटील यांनी विधानसभाध्यक्षपदी राहूल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. गिरीश महाजन यांनी त्यांना अनुमोदन दिले. यात आवाजी मतदानाने त्यांनी निवड जाहीर करण्यात आली. मात्र विरोधकांनी आवाजी मतदानाची मागणी केली असून उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी याला होकार दिला.

यामुळे आता राहूल नार्वेकर आणि राजन साळवी यांच्यात प्रत्यक्ष मतदान होणार असून याची मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यात कोण बाजी मारणार हे काही मिनिटांमध्येच जाहीर होणार आहे.

Protected Content