चंदा कोचर यांच्या अडचणीत आणखी वाढ

chanda kochar

मुंबई प्रतिनिधी । व्हीडिओकॉन समूहाच्या कर्ज प्रकरणी दोषी आढलेल्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्याविरोधात आयसीआयसीआय बॅंकेने कठोर भूमिका घेतली आहे. बोनस व इतर भत्ते वसूल करण्याची मागणी करणारी याचिका आयसीआयसीआय बँकेने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली.

बँकेने चंदा कोचर यांना एप्रिल २००६ ते मार्च २०१८ या दरम्यान दिलेली बोनसची रक्कम परत करावी, तसेच कोचर यांचे निलंबन ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी बँकेच्या वतीने करण्यात आली आहे. गैरवर्तनाच्या प्रकरणात कर्मचाऱ्याकडून बोनसची रक्कम वसूल करण्याचा बँकेला अधिकार आहे. याच अधिकारात बँकेने कोचर यांच्याविरोधात बोनसची रक्कम वसूल करण्यासाठी दावा केला आहे. याशिवाय, कोचर यांच्या कृतीमुळे बँकेची आणि बँकेच्या भाग भांडवल धारकांची मोठी मानहानी झाली आहे, बँकेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. कोचर यांनी त्यांच्या बडतर्फीच्या निर्णयाला दिलेल्या आव्हानामागेही बँकेचे नुकसान करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही बँकेने प्रतिज्ञापत्रात केला आहे.

Protected Content