शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करा, अन्यथा आत्मदहन करु – संभाजी सेना

sanbhaji sena

चाळीसगाव प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा, यासाठी संभाजी सेनेने अनेकवेळी उग्र स्वरूपाचे आंदोलन करत पुतळ्याचा विषय मार्गी लावला. परंतु अजुनही पुतळ्याचे काम अपुर्ण असल्यामुळे ते लवकर करण्यात यावे. यासाठी आज संभाजी सेनेच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मात्र, दि. 19 फेब्रुवारी 2020 पर्यंत शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण न झाल्यास त्या नियोजित जागेत १२१ संभाजी सैनिक आत्मदहन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

मागील काळात नगरपरिषदेने पुतळ्यासाठीची निविदा काढली होती. औरंगाबादच्या ठेकेदाराला पुतळा बनविण्याचे कामही देण्यात आले होते. परंतु या ठेकेदाराने वेळेत काम न दिले नाही, तसेच कोणत्याही शर्ती अटींचे पालन केले नाही. यामुळे पुतळ्याचा विषय लांबणीवर पडला आणि नगरपरिषदेला पुन्हा निविदा काढावी लागली. म्हणून संभाजी सेनेने नगरपरिषदेला ताकीद वजा दम भरला आहे की, आता ज्या ठेकेदाराला काम दिले जाईल त्याला पूर्णपणे कायदेशीर रित्या बांधून घ्यावे, जेणेकरून अगोदरच्या ठेकेदारप्रमाणे पुनरावृत्ती होणार नाही. पुतळ्याचे काम लांबणीवर पडणार नाही. तसेच निवेदन, मुख्यमंत्री, पालकमंत्री, जळगाव जिल्हाधिकारी, जळगाव पोलीस अधीक्षक, जळगाव अप्पर पोलिस अधीक्षक, चाळीसगाव उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चाळीसगाव यांना देण्यात आले असून निवेदनावर लक्ष्मण शिरसाठ, गिरीश पाटील, सुनील पाटील, अविनाश काकडे, सुरेश तिरमली, दिवाकर महाले, ज्ञानेश्वर पगारे, सुरेश पाटील, विजय देशमुख, अमर भोई, भैया देशमुख, नामदेव पाटील, अमोल पाटील, अरमान खाटीक, स्वप्नील महाजन व प्रमोद महाजन आदींच्या सह्या आहेत. व असे न झाल्यास या प्रसंगी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कोणत्याही परिस्थितीत सर्वस्वी शासन आणि प्रशासनच जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असे यावेळी सांगण्यात आले आहे.

Protected Content