जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च एमबीए महाविद्यालयात आज शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महाविघालायचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापन करण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती सांगितली. छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम संघटक होते. छत्रपती शिवाजी महाराजांची युध्दनिती कलेचा अभ्यास करून आयुष्यातील मोठया संकटावर न खचता सामोरे जात त्यावर मात करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहीजे. त्यांची दूरदृष्टी सारखे गुण जर विद्यार्थ्यांनी जोपासले तर भविष्यात त्यांना कसलीही अडचण येणार नाही असे त्यांनी सांगितले. सदर कार्यक्रम ऑनलाइन घेण्यात आला. प्रा. प्रीती फालक यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमात BCA ची विद्यार्थिनी भूमिका नाले हिने यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी माहिती दिली. MBA च्या विद्यार्थिनी वर्षा झोपे, स्नेहल पाटील यांनी महाराज्यांच्या काळात महाराष्ट्राची स्थिती किती चांगली होती, राष्ट्रावर महाराजांचे असलेले प्रेम, सुखी जनता यावर आपल्या भाषणांमधून प्रकाश टाकला. यावेळी पोवाडे गायन सुद्धा केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल साईंकर या विद्यार्थिनीने केले. आभार प्रदर्शन भूमिका नाले या विद्यार्थिनीने केले.
यावेळी महाविद्यालयाचे डॉ. नीलिमा वारके, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. चेतन सरोदे, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. आफ्रिन खान, प्रा. अश्विनी सोनवणे, प्रा. श्रुतिका नेवे, प्रा.चारुशीला चौधरी, प्रा. मिताली शिंदे, प्रा. प्रिया फालक, प्रा. चंद्रकांत डोंगरे, प्रा. दिपक दांडगे, श्री. मयुर पाटील, गौरव पाटील, श्री. सागर चौधरी, श्री. गणेश सरोदे, श्री. प्रशांत किरंगे, श्री. जीवन पाटील, श्री. प्रफुल्ल भोळे, श्री. रुपेश पाटील, घनश्याम पाटील, रुपेश तायडे, सौ. जयश्री चौधरी, सौ. भावना ठाकूर इ. कर्मचारी उपस्थित होते.