पीक विमा कंपन्यांना शिवसेनेचा पंधरा दिवसांंचा अल्टीमेटम

THAKRE

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. विमा कंपन्यांनी आणि बॅंकांनी १५ दिवसांत जी काही प्रकरणे आहेत, ती सर्व निकाली काढली पाहिजे. अन्यथा आम्हा १६ व्या दिवसांपासून शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा थेट इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

 

आज खासगी विमा कंपनीच्या कार्यालयावर शिवसेनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खासगी पीक विमा कंपन्यांविरोधात मुंबईत मोर्चा काढला. राज्यातील खासगी पीक विमा कंपन्यांवरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत काढलेल्या या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले. यावेळी ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘आवाज कुणाचा…. शिवसेनेचा’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. हा मोर्चा वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) ‘भारती अॅक्सा’वर धडकला. शिवसेना झिंदाबाद, आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला आहे. उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

 

यावेळी युवासेनेचे आदित्‍य ठाकरे, खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, शिवसेना सचिव आदेश बांदेकर सहभागी झाले होते. खासगी विमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चासाठी शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या मोर्चाच्यावतीने शिवसेनेने मोठे शक्तिप्रदर्शन केले. शेतकर्‍यांना नडणार्‍यांना धडा शिकवल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. सरकारच्या योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत. सगळ्या कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांची नावे बँकांनी लावली पाहिजेच, अशी मागणी त्यांनी केली. काही ठिकाणी कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले गेले, मात्र कर्जमाफी झालीच नाही. हे सगळे प्रकार टाळण्यासाठी ही मागणी आम्ही केली आहे, असे ते म्हणाले.

Protected Content